बाजार समितीच्या कामकाजाचा प्रशासक रत्नाळे यांनी घेतला आढावा..!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  नगरच्या माजी खा. स्व. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार घेतल्यानंतर तालुका उपनिबंधक के.आर रत्नाळे यांनी शुक्रवारी बाजार समितीच्या सर्व अधिकारी – कर्मचारी यांची बैठक घेवून कामकाजाचा आढावा घेतला.

बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस बाजार समितीचे सचिव अभय भिसे, सहाय्यक सचिव संजय काळे, बाळासाहेब लबडे, सचिन सातपुते, निरीक्षक जयसिंग भोर, सयाजी कराळे,

भाऊसाहेब कोतकर, संदीप शिंदे, दिनेश येवले यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांकडून प्रशासक रत्नाळे यांनी विभागानुसार यार्डवर येणाऱ्या विविध प्रकारच्या भुसार व भाजीपाला मालाची आवके बाबत आढावा घेतला.

तसेच समितीचे सुरक्षाधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन करुन सुचना देण्यात आल्या.

भुसार विभागातील ई-नाम कार्यप्रणालीबाबत माहिती घेवून सदरचे कामकाजात सुधारणा करणेबाबत सुचना देण्यांत आल्या. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपआपली दिलेली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडण्याच्या सुचना दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News