अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात एका टायर पंक्चर काढणार्याची धारधार शस्त्राने निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार दि.3 ते 4 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली होती.
यात अब्दुल मोहम्मद युनिस कादीर (वय 27, रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. तर घटनास्थळाहून पोलिसांनी एक टामी, आणि एक धारधार सत्तूर ताब्यात घेतला.
हा खून कोणी केला असा प्रश्न पडलेला असताना पोलीस उपाधिक्षक आणि संगमनेर ग्रामीण पोलिसांनी त्याचा छडा लावला आहे. यात कादीर याचा मित्रच नवश्याद अब्दुल अन्सारी (वय 45, रेहमतनगर, ता. संगमनेर) यानेच ही निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कारण, या दोघांनी एकत्र येऊन बेकरी सुरू केली होती. त्यात कादीर याने जास्त गुंतवणुक केली होती. अन्सारी हा पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते.
त्याचे रुपांतर टोकाच्या वादात झाले आणि अन्सारी यास प्रचंड राग आला व त्याने आपल्या मित्रास रात्री वाजण्याच्या सुमारास भोकसून ठार केले.
हा प्रकार पोलिसांनी उघड केला असून अन्सारी यास संशयीत म्हणून ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.
या आरोपीचा मागमूस घेण्यासाठी पोलीस उपाधिक्षक यांच्या पथकाने आपली प्रतिष्ठा पुन्हा पणाला लावली होती. त्यात त्यांना अवघ्या तासात यश आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम