सोशल मीडियावर ‘ती’एक पोस्ट टाकणे पडले महागात..?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा शहरातील एका इसमाने जातीयवाद पसरवण्याचा हेतूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तात्काळ संबंधीतास अटक केल्याने हा वाद निवळला.

श्रीगोंदा तहसील कार्यालय आवारात टायपिंग झेरॉक्स असा व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी असलेल्या एकाने व्हॉटसग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट करुन दोन जातीमध्ये वाद होवुन शत्रुत्व निर्माण होईल.

या व्देष भावनेने ती फोटो टाकून पोस्ट प्रसारीत केल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून ती पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन,त्याला अटक केली आहे.

या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुनिल सुर्यवंशी हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News