‘उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; ‘या’ भाजप नेत्याचे विधान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेमध्ये जात असताना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्की दरम्यान सोमय्या पायऱ्यांवरून घसरून पडले.

संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

उद्धव ठाकरे माफीयासेनेचे अध्यक्ष ज्यांनी मला अडवण्यासाठी गुंडांना पाठवलं होतं, परत त्याच ठिकाणी आता जात आहे असं सोमय्या म्हणाले.

पुढे सोमय्या बोलताना म्हणाले की, महापालिकेत माफीयासेनेनी गुंडगिरी केली होती. ते त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून केली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला.

पुणे पोलिसांकडे तक्रार देणार आहे ती त्यांना पोलिसांपर्यंत घेऊ द्यायची नाही म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. कोरोना सेंटर प्रकरणाची चौकशी झाली तर उद्धव ठाकरेंना जाब विचारला जाईल आणि त्यांना याचं उत्तर देणं भारी पडणार आहे.

तीन लोकांवर सुजित पाटकर, संजय राऊत आणि ऑर्डर देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करावा लागणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!