गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात आज सुट्टी मात्र शेअर मार्केट…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने आज राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे आज महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांही या काळात बंद राहतील.

मात्र शेअर मार्केट सुरु राहणार आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अर्थात सार्वजनिक सुट्टी असली तरी आज बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरु राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार सात फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की,

रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. लता दीदींच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या

अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं शासनानं म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!