अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- युवकावर सत्तूरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा अरबाज शकील सय्यद (इम्पेरिअल चौक, नगर) याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
या गुन्ह्यातील आरोपी शकील उर्फ गुलू हमीद सय्यद, आदम बाबा बागवान (रा. नालेगाव, नगर) यांना यापूर्वीच अटक केलेली आहे.
फैयाज अक्तार शेख (वय 24 रा. खाटीकगल्ली, आशा टॉकीजमागे, नगर) या युवकावर तिघांनी मागील भांडणाच्या कारणातून बारादरी शिवारात सत्तूरने हल्ला केला होता.
याप्रकरणी शेख यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेख आणि आरोपी यांचे यापूर्वी भांडण झाले होते.
या कारणातून आरोपी यांनी फिर्यादीच्या मानेवर सत्तूरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असताना तेव्हा फिर्यादीने डावा हात मध्ये घातला.
यामुळे फिर्यादीचे डावे हाताचे अंगठ्या जवळील बोटाला मार लागला व रक्तस्राव होऊन फिर्यादी गंभीर जखमी झाले होते. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले होते.
शकील ऊर्फ गुलू सय्यद व आदम बागवान यांना नगर तालुका पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. अरबाज सय्यद हा पसार होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम