बिग ब्रेकिंग : भारतात चक्रीय वाऱ्याचं संकट; महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात परिणाम होणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  सध्याच्या पश्चिमी वाऱ्यांच्या चक्रावातामुळे (Western Disturbance) हिमालयीन प्रदेशासह जम्मू काश्मीर आणि लगतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टी (Snowfall) होत आहे.

त्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्राच्या वायव्य भागात धडकत आहेत. त्यामुळे राज्याच्या वायव्य भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे (temperature drop in maharashtra).

आता याच भागात चक्रीवादळाच वातावरण तयार झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझप्फरबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.

तर हिमालयीन भागात हिमवृष्टी होईल असे हवामान खात्याने सांगितले. पश्चिमी वाऱ्यांच्या चक्रावातामुळे मागील काही दिवसांपासून हिमालयीन प्रदेशासह जम्मू काश्मीर आणि लगतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टी होत आहे.

त्यामुळे आता हवामान खात्यानं 8 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझप्फरबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, चक्रिय वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंतेत आणखी भर पडली आहे.

या सर्व बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, म्हणजेच संपूर्ण खान्देश तसेच बुलढाणा,अमरावती नागपूर, नाशिक औरंगाबाद या जिल्ह्यात होईल. त्यामुळे तिथेही शेतकऱ्यांनी उभ्या, काढणी केलेल्या पिकांची विशेष योग्य ती काळजी घ्यावी.

8 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा वायव्य भारतात पश्चिमी वाऱ्याच्या डिस्टर्बन्समुळे काही बदल होतील. त्यामुळे 9 आणि 10 फेब्रुवारीच्या कालावधीत नागपूरसह विदर्भात तापमानाचा पारा अचानक 2 ते 4 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात पुन्हा एकदा धुळीचे वादळ निर्माण झालं आहे. येत्या काही तासांत राजस्थान आणि गुजरातमध्येही याचा परिणाम जाणवणार आहे.

पश्चिमी चक्रवात/ वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे काय ? :- वेस्टर्न डिस्टर्बन्स किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स हा एक प्रकारचा उष्णकटिबंधीय वादळ आहे जो भूमध्य प्रदेशात उद्भवतो आणि हिवाळ्याच्या हंगामात उत्तर भारतात पाऊस पाडतो. हवामान खात्याच्या व्याख्येनुसार उत्तर- पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे भारतीय प्रदेशातील हवामानात अचानक झालेला बदल म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स. यामुळे भारतात अचानक थंडी, पाऊस , हिमवृष्टी असे प्रकार होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe