भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज शुक्रवार रोजी (11 फेब्रुवार) रोजी खेळवण्यात येणार आहे.

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवलेली रोहित ब्रिगेड तिसरा सामनाही खिशात घालण्याच्या तयारीत आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या तिसऱ्या वनडेमध्ये शिखर धवन खेळणार आहे.

स्वत: रोहित शर्मानेच हे संकेत दिले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे शिखरला पहिल्या दोन वनडे सामन्यांना मुकावे लागले होते. त्याच्याजागी पहिल्या सामन्यात इशान किशन तर दुसऱ्या वनडेत ऋषभ पंत सलामीला आला होता.

हे दोन्ही प्रयोग यशस्वी होऊ शकले नाहीत. वेस्ट इंडिजने मालिका आधीच गमावली आहे. पण प्रतिष्ठा वाचवण्याच्या उद्देशाने तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरेल.

सामना कधी खेळला जाणार? : तिसरा वनडे सामना 11 फेब्रुवारीला खेळला जाणार

सामन्याचे स्थान – तिसरा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवर खेळला जाणार आहे.

सामन्याची वेळ – तिसरी वनडे मॅच दुपारी 1.30 वाजता सुरु होईल.

सामन्याचं लाइव्ह टेलिकास्ट – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News