अरे देवा:जिल्ह्यातील ‘तो’ कारखाना तातडीने बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. कारखान्याची टाकी फुटल्याने तब्बल साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात घुसली आहे.

यामुळे शेतीचे होणारे प्रदूषण लक्षात घेता मंडळाने ही कारवाई केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महर्षी नागवडे श्रीगोंदा साखर कारखान्याची साडेचार हजार टनाची मळीची टाकी अचानक फुटली.

त्यामुळे आजूबाजूच्या शेकडो एकर शेतात ही मळी पसरली. तसेच ही मळी कारखान्याच्या आवारातील विविध ठिकाणी आणि यंत्रणेमध्येही गेली. परिणामी, शेतकऱ्यांसह कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. येथील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन तातडीने कारखाना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारखान्याच्या मळीमुळे होत असलेल्या नुकसान आणि प्रदूषणाची दखल घेत काहींनी जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंक्षण मंडळ, सहकार विभाग, मंत्रालय,

औद्योगिक सुरक्षा मंडळ, कामगार उपायुक्त, आदींकडे तक्रार केली. याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तत्काळ कारखाना बंदचे आदेश दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News