विवाहित तरुणाने फाशी घेऊन संपविले जीवन

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील स्वामीनगर येथे विवाहित तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

हर्षल अनिल राणे(वय-२६) असे फाशी घेतलेल्या pविवाहित तरुणाचे नाव असून घरात कोणीही नसताना हर्षल याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.

शनिवारी सकाळी राणे यांच्याकडे त्यांच्या ओळखीची व्यक्ती गेली असता त्यांना फाशी घेतलेल्या अवस्थेत हर्षल दिसून आल्याने त्यांनी तातडीने शेजारील नागरिकांना सांगितले.

याबाबत राहुरी पोलिसांना कळविले असता पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News