तिजोरी फोडण्यात चोरटे अपयशी ठरल्याने मोठा अनर्थ टळला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील मुळाडॅम फाटा येथील दि राहुरी अर्बन निधी संस्थेच्या कार्यालय फोडून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे.

दरम्यान, हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र चोर्‍यांचा तपास लावण्यात व गुन्हेगारी रोखण्यास नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे अपयशी ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

हे चोरटे सुमारे दीड तास संस्थेच्या कार्यालयाजवळ दबा धरून बसले होते. संस्थेबाहेरील विजेचे दिवे व सीसीटीव्ही कॅमेरेही चोरट्यांनी फोडून संस्थेत प्रवेश केला.

संस्थेचे कुलपाचे कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी संस्थेत प्रवेश केला. परंतु चोरट्यांना संस्थेतील तिजोरी फुटलीच नाही. त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

तालुक्यात सध्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून खून, दरोडे, चोर्‍या, अपहरणाच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत.

पोलीस गस्तीवर असतानाही चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोर्‍या करत आहेत. यामुळे तालुक्यातील जनतेमधून पोलिसांविषयी संताप व्यक्त केला जातो आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe