व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या प्रियजनांना द्या मराठमोळी शुभेच्छा!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  आज 14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे चं सेलिब्रेशन बद्दल जगभरात तरूणाईला विशेष आकर्षण असतं.

14 फेब्रुवारी दिवशी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यापूर्वी आठवडाभर रोमॅन्टिक सेलिब्रेशन करतात. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याची वेळीच कबुली देणं देखील गरजेचे आहे.

मग आजचा प्रेमाचा दिवस त्यासाठीच स्पेशल आहे. मग तुमच्या आयुष्यात असणार्‍या ‘त्या’ खास व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देण्याचा आजचा दिवस दवडू नका. तसेच जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आज व्हेलेंटाईन डेचं औचित्य साधून आपल्या अप्रियजनांना शुभेच्छा पाठवा…

व्हॅलेंटाईन डे रोमॅन्टिक शुभेच्छा प्रेम या दोन अक्षरातच जीवनाचा खरा अर्थ दडला आहे या अर्थाच्या शोधातच एक जीव दुसर्‍यावर जडला आहे ! Happy Valentine’s Day My Love!

हसणे तुझे ओठांवरचे गुलाबापरी फुलताना सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मीठीत असताना Happy Valentine’s Day

तुझ्यावर रूसणं, रागावणं मला कधीच जमलंच नाही कारण तुझ्याशिवाय माझं मन दुसर्‍या कुणात कधी रमलंच नाही! Happy Valentine’s Day

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत फक्त मला प्रिये… त्यासाठी, साथ तुझी हवी आहे… Happy Valentine’s Day!

व्हेलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस असल्याने तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी तो अधिक स्पेशल करा. प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हेलेंटाईन डे या केवळ एका दिवसाची गरज नाही परंतू किमान या एका दिवसाचं औचित्य साधून तुमच्या साथीदाराचा दिवस स्पेशल करण्यासाठी थोडं खास प्रयत्न करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe