अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणामध्ये शिल्लक असून देखील हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत.
हे हक्काचे पाणी मिळवायचे असेल, तर या ९ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा करायला हवा, तरच हे पाणी मिळणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुळा एरिगेशन विभागाचे निवृत्त अभियंता बप्पासाहेब बोडखे यांनी आखेगाव येथे केले.
आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष व लेखक ॲड. शिवाजीराव काकडे लिखित वरूर – आखेगावसह ९ गावांची जलसिंचन योजना (सुधारित ताजनापूर टप्पा क्रमांक १) या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दगडू काटे होते. यावेळी लेखक ॲड. शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, पावन गणपती संस्थांनचे मठाधिपती रामनाथ महाराज शास्त्री, गणेश महाराज डोंगरे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, कॉम्रेड भगवानराव गायकवाड, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, प्रशांत भराट उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम