‘ते’ अडीच वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’ देत आहेत…! आमदार रोहित पवार यांची टीका

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र सरकारविषयी नेहमीच वेगवेगळे भाकित करत असतात, असे करता करता अडिच वर्षे पुर्ण झाली आहेत तरीही त्यांची भविष्यवाणी काही खरी झाली नाही.

अशी टिका आमदार रोहित पवारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. जामखेड तालुक्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की, देशात कुठल्याही राज्यात निवडणूका आल्या महाराष्ट्र सरकार पडणार असा जनतेत संभ्रम निर्माण केला जातो.

आता देखील दहा मार्च सांगितले होते पण वर्षे सांगितले नव्हते. वास्तविक पाहता बिहार व उत्तरप्रदेश निवडणुकीचा आणी महाराष्ट्रातील राजकारणाचा

काहीही संबध नाही महाराष्ट्राचे अनेक प्रश्न केंद्राकडे प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.असा टोला देखिल त्यांनी लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe