अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- राज्यात कोरोनाचं संकट असताना आता यामध्ये आणखी एक भर पडली आहे टी म्हणजे बर्ड फ्लू नावाचं नवं संकट होय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने शिरकाव केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ठाण्यातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा या विषाणूची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यामुळे आता पशुपालकांसह पोल्ट्री चालकांमध्ये मोठी खळबळ उडालीय. दरम्यान पशुसंवर्धन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील वेल्हेवली येथील फार्मध्ये काही पक्षांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
ज्या फार्ममधील पक्षांना लागण झालीय तिथे 200 कुक्कुटपालन केलेले पक्षी असल्याची माहिती आहे. संबंधित फार्ममध्ये 2, 5 आणि 10 फेब्रुवारीला काही पक्षांचा मृत्यू झाला होता.
विशेष म्हणजे सुरुवातीला काही पक्ष्यांवर उपचार करुनही त्यांचा मृत्य झाला. मृत पक्षांचे नमुने गोळा करण्यात आले होते. ते नमुने रोग तपासणी विभागात पाठवण्यात आले.
दरम्यान, शहापूरच्या फार्ममध्ये बर्डफ्लू आढळल्यानंतर त्या फार्मपासून एक किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.
बर्ड फ्लू वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. एक किमीच्या परिघातील पक्षांची मोजनी सुरु आहे.
तसेच त्या भागातील पक्षी आणि अंडी नष्ट करण्याच्या दृष्टीकोनाने उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रशासनाकडून घाबरुन न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम