पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्यात येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा राज्याचे पर्यटन मंत्री मा. आदित्‍य ठाकरे हे आज (दि. 18 फेब्रुवारी 2022 )रोजी अहमदनगर जिल्‍हा दौ-यावर येणार आहे. त्‍यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

असा असणार आहे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता मुंबई येथुन खाजगी विमानाने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी 1.30 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री साईबाबा देवस्‍थान, शिर्डीकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता श्री साईबाबा देवस्‍थान, शिर्डी येथे आगमन व राखीव.

दुपारी 2 वाजता मोटारीने सोनई, ता. नेवासाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता सोनई येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता मुळा सहाकारी साखर कारखान्‍याच्‍या इथेनॉल प्रकल्‍पाच्‍या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता मोटारीने जि. औरंगाबाद (संभाजीनगर) कडे प्रयाण.