Panjabrao Dakh Havaman Andaj : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस आला सुरुवात होणार आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने देखील आगामी काही दिवस राज्यात पाऊस पडणार असे म्हटले आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच सहा मे 2024 ला राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज विदर्भ भागातील अकोला जिल्ह्यात काही भागांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे.
यामुळे येथील नागरिकांनी विशेष सावध राहणे आवश्यक आहे. दुसरीकडे आज मराठवाडा विभागातील लातूर, नांदेड आणि विदर्भ विभागातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा चिंतेत आणखी भर पडली आहे.
गेल्या महिन्यात राज्यात वादळी पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला होता. काही ठिकाणी तर गारपीट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अशातच आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावू लागले आहे.
जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 7 मे 2024 पासून ते 11 मे 2024 पर्यंत महाराष्ट्रात अगदी शेतातून बाहेर पाणी निघेल असा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
या कालावधीत पावसाची जोरदार बॅटिंग होणार आहे. पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये तर गारपीट होण्याची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील या कालावधीत पावसाचा अंदाज असून येथील ऊस पिकाला या पावसाचा मात्र मोठा फायदा होऊ शकतो अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
खोडवा ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे. तथापि इतर शेतमालाचे मात्र या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहेत. हवामान खात्याने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला होता. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगणात मावत नव्हता.
परंतु आता आय एम डी ने तथा ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी सात मे पासून पुढील पाच दिवस म्हणजेच 11 मे पर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार असे म्हटले आहे.