Ahmednagar News : श्रीगोंदे अपघातातील मृतांची संख्या पाचवर ! चार चेअरमन, संचालकांचा समावेश, नेमका का व कसा घडला हा अपघात? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:
shrigonde apghat

Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव शिवारात एसटी बस आणि इर्टिगा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघत झाला. या अपघातातमध्ये पारगाव सुद्रिक येथील दत्तात्रय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बापू मडके, हरिभाऊ तुकाराम लडकत, विश्वनाथ लक्ष्मण ननवरे या चौघांचा मृत्यू झाला होता.

तर तीन जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यातील सदर इरीटीगा कारचे चालक विठ्ठल ढोले, रा. लोणी व्यंकनाथ यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होऊन ती आता पाच झाली आहे.

अपघातांत मयत झालेल्या चार जणांवर काल रात्री पारगाव सु.येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव दुःखात बुडाले आहे.

जे चौघे मृत झाले आहेत त्यापैली तिघे पारगाव सोसायटीचे संचालक तर एक जण व्हाईस चेअरमन होते. हे सर्वजण अनेक वर्षांपासून मित्र होते. मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एस टी चालक संतोष बाजीराव गावडे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरूद्ध फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय.

म्हणून एक जण बचावला..
काल पारगाव येथून एकूण आठ व्यक्ती आळंदी येथे देव दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यातील गोपीनाथ हिरवे हे कामानिमित्त पुण्यातच उतरले. आणि उर्वरित सात जण परतीच्या प्रवासाला पारगाव कडे निघाले असता त्यांच्या वाहनाचा मध्येच अपघात झाला.

त्यामध्ये आत्तापर्यंत पाच जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. दैव बलवत्तर म्हणून, हिरवे या अपघातातून बचावले. परंतु, आपल्या मित्रांच्या अपघाती जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे

कसा घडला अपघात..
एस टी चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर इरटीगा गाडीचा चालक समोर चाललेल्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना, वळणाचा रस्ता आणि वाहन नियंत्रित न झाल्याने, हा अपघात झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe