अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- वेस्ट इंडिज विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने भारताने जिंकली. त्यानंतर आता टी20 मालिकेतही विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला आहे.
कारण भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 6 विकेट्सनी मात दिली.
पहिल्या सामन्यात भारताचा युवा फिरीकपूट रवी बिश्नोईने संघात आगमन केलं. त्याने भारतीय संघातून पहिला सामना खेळला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून भारतासमोर 158 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतानं 4 विकेट्स गमावून 18.5 षटकात 162 धावा केल्या.
पहिला सामना जिंकल्यानंतर आता दुसरा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेईल. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर टी20 सामन्यांची मालिकाही जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 20 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. आजचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, कुलदीप यादव.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम