अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- महावितरणच्या निष्काळजीपणाचा मोठा आर्थिक फटका नेवासा तालुक्यातील मंगळापूर येथील सुनिल जगन्नाथ शिंदे या शेतकऱ्याला बसला आहे.
महावितरण कंपनीच्या उच्चविद्युत वाहिनीचा पोल ऊसावर पडून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शिंदे यांचा अडीच एकर ऊस जळाला आहे.

दरम्यान अधिक माहिती अशी की, शिंदे यांचा मंगळापूर शिवारातील गट नंबर 74 मध्ये 12 महिने वयाचा ऊस पीक आहे. बुधवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास महावितरण कंपनीच्या 11 केव्हीए उच्चाविद्युत वाहिनीचा पोल कोलमडून ऊसावर पडला.
विद्युत वाहिणींच्या वीज प्रवाह सुरू असलेने तारांचे एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट होऊन आग लागली व त्यात शेतात उभा आलेला अडीच एकर ऊस जळाल्याची घटना घडली आहे.
यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तरी महावितरण प्रशासनाने संबधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम