अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगरसेविकेवर गोळीबार !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी शहर हद्दीतील आदिवासी समाजाच्या वसाहत येथे माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी घडली आहे.

आदिवासी समाजाच्या वसाहत येथे वास्तव्यास असलेल्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात नगरसेविका बर्डे जखमी झाला असून त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.

जुन्या वादातून गोळीबार केल्याची चर्चा परिसरातून होत आहे असून गोळीबाराच्या घटनेनंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल होऊन गर्दी आटोक्यात आणली.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चौघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe