म्हणून हेलिकॉप्टर कंपनीवर केला गुन्हा दाखल..!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी बुक केलेल्या हेलिकॉप्टर कंपनीने ऐनवेळी हेलिकॉप्टर न देऊन फसवणूक केल्याने त्या कंपनीवर सकल मराठा समाजाचे रणजित नलवडे यांनी गुन्हा दाखल केला.

कर्जत येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजन्मोत्सवा विविध कार्यक्रमांत कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भव्य अश्वारूढ छ. शिवाजी महाराज पुतळा यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार होती.

यासाठी येणारा खर्च रणजित नलवडे हे करणार होते, काही दिवसांपूर्वी चेंबूर, मुंबई येथील कंपनीकडे त्यांनीहे सर्व पैसे भरून हेलिकॉप्टर बुक ही केले होते.

मात्र सदर कंपनीने दि.१८ फेब्रुवारी रोजी हेलिकॉप्टर देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध नलवडे यांनी फसवणूक केल्याची ऑनलाइन फिर्याद दाखल केली आहे. हेलिकॉप्टर मिळू न शकल्याने हवाई पुष्पवृष्टी चा कार्यक्रम रद्द करावा लागला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe