छत्रपती शिवरायांचे विचार कृतीत आणण्याची गरज:- शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  दिनांक १९ फेबुवारी २०२२ रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांचा पुतण्या चि.आशिष व चि.सौ.का.तेजस्वीनी यांच्या शुभविवाह प्रसंगी शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे म्हणाले छत्रपती शिवरायांचे विचार कृतीत आणण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे.

प्रथमत: छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले,जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.मनोज पाटील,पद्मश्री पोपटराव पवार, मा.श्रीनिवास अर्जुन प्रांताधिकारी अहमदनगर,

मा.तहसीलदार सुधीर पाटील,मा.उदयदादा शेळके चेअरमन अहमदनगर जिल्हा सहकारी बँक,मा.बाबासाहेब भोस मा.जि.प.अध्यक्ष,माधवराव लामखडे जि.प.सदस्य,मा.रावसाहेब पाटील शेळके मा.सभापती अर्थ व बांधकाम जि.प.अहमदनगर तसेच प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली.

डॉ.शेटे पुढे बोलताना म्हणाले,आजच्या तरुणाईच्या हातातच कुटुंबांचे आणि गावाचे भवितव्य अवलंबून आहे.तरुणाई डी जे तालावर नाचत असताना

पद्मश्री पोपटराव पवारांनी लग्नसोहळ्यात छत्रपती शिवरायांचे व्याख्यान आयोजित करून नवीन संकल्पना राज्याला दिली.सध्या जयंती ,लग्नसोहळा, वाढदिवस या पद्धतीने साजरे होतात त्यात तरुणाई व्यसनाधीन होत आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेले जलसंवर्धन ,कृषीविकास आणि ग्रामविकास धोरण प्रत्यक्ष हिवरे बाजारने कृतीत आणले आहे.

त्यामुळे जयंती आणि पुण्यतिथी यातून राष्ट्रपुरुषांच्या विचार प्रत्यक्षात कृतीत आणलयास त्यातून निर्व्यसनी व स्वावलंबी गावे उभी राहतील अशी संकल्पना त्यांनी मांडली.कार्यक्रमास मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe