ट्रकमधून कत्तलीसाठी आणलेल्या 18 गोवंशीय जनावरांची सुटका; दोघांविरूध्द गुन्हा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  कत्तलीसाठी आणलेल्या 18 गोवंशीय जनावरांची सुटका करून ट्रकसह 13 लाख 34 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

याप्रकरणी शाहरूख सादीक सय्यद (रा. माळीचिंचोरा ता. नेवासा), रिजवान नियाज पठाण (रा. चांदा, घोडेगाव रोड ता. नेवासा) यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भातोडी पारगाव (ता. नगर) शिवारात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे आणली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

पथकाने या माहितीनुसार छापा टाकून ट्रक व 18 जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. सुटका केलेल्या गोवंशीय जनावरे गोशाळेत देण्यात आले असून, ट्रक जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe