अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढत असताना शहर पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. दुचाकी चोरी करणार्या टोळ्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहेत.
यामुळे दररोज नगर शहरातून दुचाकी चोरीला जात आहेत. दुचाकीला चोरीला जाण्याचे सत्र नगर शहरात सुरूच आहे. सावेडी उपनगरातील सोनानगर चौक येथे राहणारे सोनार सुधीर उमाकांत कुलथे (वय 52) यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली.
कुलथे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कायनेटिक चौकाजवळ असलेल्या रविश कॉलनीमधून दुचाकी चोरीला गेली आहे.
याप्रकरणी प्रकाश प्रभाकर कांबळे (वय 26 रा. चिलेखनवाडी ता. नेवासा, हल्ली रा. रविश कॉलनी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वस्तिक बसस्थानक परिसरात उभी केलेली दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी देविदास महादेव वीरकर (वय 29 रा. शाहूनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.