‘ त्या’ आरोपीच्या घरात गावठी कट्टा बनविण्याचे साहित्य व हत्यार मिळल्याने खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी शहर हद्दीत ग्रामीण रुग्णालयात परिसरात राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. सोनाली बर्डे यांच्यावर किरकोळ कारणावरून गावठी कट्ट्यातून गोळीबार झाला होता.

घटनेनंतर पोलिस पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता काहि हत्यारे व गावठी कट्टे बनविण्याचे साहित्य मिळून आले. राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक निरज बोकील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,

दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजे दरम्यान शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या समोर राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. सोनाली बर्डे यांच्यावर अंकुश नामदेव पवार याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता.

या घटनेत सौ. सोनाली बर्डे यांच्या दंडाला गोळी लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, श्रीरामपुर येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उप निरीक्षक निरज बोकील यांनी घटनास्थळी भेट दिली. घटने नंतर आरोपी अंकुश नामदेव पवार याच्या घराची झडती घेतली.

त्यावेळी त्यांना काहि हत्यारे तसेच गावठी कट्टे बनविण्यासाठी लागणारे फायबरचे ड्रिल मशिन, हॅण्ड ग्राईंडर मशिन, ग्राईंडर मशीनचे पाते, लोखंडी स्प्रिंग, लोखंडी छ-याचे मनी, लोखंडी गोळी, गोळीचे राऊंड, गोळी बनविण्यासाठी लागणारी गण पावडर,

आयटम बाॅम्ब असा मुद्देमाल मिळून आला. त्यानूसार पोलिस उप निरीक्षक निरज बोकील यांच्या फिर्यादीवरून अंकुश नामदेव पवार याच्या विरोधात आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी अंकुश नामदेव पवार हा यु ट्युबवर पाहून घरातच गावठी कट्टे व गोळ्या बनवीत होता. असे माहिती मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe