यामुळे आता पेटीएमच्या शेअर्सच्या किमती सुधारतील

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या शेअर मार्केटवर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. यातच शेअर बाजरमध्ये मोठी पडझड होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एका शेअर बाबत सध्या दिलासादायक माहिती समोर येत आहे.

ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म ICICI सिक्युरिटीजने आता पेटीएमच्या शेअरला BUY रेटिंग दिली आहे. तसेच एका रिसर्चमधून असे दिसून आले आहे की या महिन्यात बाजार विश्लेषकांनी पेटीएमच्या स्टॉकमध्ये विक्रीपेक्षा अधिक खरेदीचे मत दिले आहे.

यामुळे आता पेटीएमच्या शेअर्सच्या किमती सुधारतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान Paytm चा शेअर लिस्टिंग झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना तोटा देत आहे. लिस्ट झाल्यानंतर त्यात सुमारे 48 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

एवढेच नाही तर वार्षिक आधारावर हा स्टॉक 2022 मध्ये 39 टक्क्यांनी घसरला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आता पेटीएम वर BUY रेटिंग दिले आहे आणि त्याचे टार्गेट 1352 दिले आहे.

ब्रोकरेज हाऊसचा असा विश्वास आहे की हा स्टॉक सध्याच्या पातळीपेक्षा 64 टक्क्यांनी वाढू शकतो. वॅल्यूएशन आणि व्याजदरातील वाढीशी संबंधित चिंतेचा स्टॉकवर परिणाम झाला आहे.

मात्र अपेक्षेपेक्षा कमी कमाई करणे आणि वित्तीय सेवा व्यवसायातील प्रतिकूल नियामक भूमिका कंपनीसाठी धोक्याचे ठरू शकते. पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications Ltd च्या स्टॉकसाठी खरेदीच्या शिफारसींची संख्या विक्रीच्या शिफारशींपेक्षा जास्त आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe