मनपाची थकबाकी न भरल्याने केली ‘ही’ कारवाई..!

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- सध्या खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था मनपाची झाली आहे. त्यातच परत प्रभागात एखादी सुविधा कमी असेल तर मनपा प्रशासनाच्या नावाने गळा काढला जातो

तर दुसरीकडे मालमत्ता कर भरण्याकडे काना डोळा करणारे देखील अनेकजण आहेत. मात्र आता मनपा प्रशासनाने अशा थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जात आहे.

नुकतीच प्रभाग समिती क्रमांक ४ बुरुडगाव विभागाअंतर्गत वॉर्ड २२ मधील टिळक रोड येथील मिळकतीवरील १ लाख ३३ हजारांची थकबाकी न भरल्याने मालमत्ता जप्तीची कारवाई मनपा प्रशासनाने केली आहे.

प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, वसुली अधिकारी सय्यद हाफीज राजा, कर निरीक्षक व्ही.जी.जोशी, राजेंद्र म्हस्के, रमेश कोतकर, संकेत कोतकर यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News