चोरटयांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली; शेतीच साहित्य नेले चोरून

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. नुकतेच चोरटयांनी विहिरीतून आठ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची घटना राहाता तालुक्यातील दहेगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी नानासाहेब रामहरी गुंजाळ (रा. दहेगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नानासाहेब गुंजाळ यांची दहेगाव मध्ये सामाईक विहिरीतील 8000 रुपये किंमतीची इलेक्ट्रीक मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

तसेच विहीरीवरील मोटारचा स्टार्टर चोरून नेला आहे. विहिरीविरील पाण्याच्या पाईप तोडून विहिरीत फेकून देवून व विहीरीतील वायरचे कट विहीरीत फेकून नुकसान केले. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News