अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत यंदाच्या वर्षासाठी हरभरा खरेदी केंद्र राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे सुरु झाले आहे.
अशी माहिती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवराज तनपुरे यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकर्यांना आपली नाव नोंदणी करायची त्यांनी दि.19 फेब्रुवारीपासून नावे नोंदवावीत, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
शेतकर्यांची नोंदणी राहुरी येथील खरेदी विक्री संघाचे कार्यालय, गाडगे आश्रम शाळेसमोर करण्यात येईल. दरम्यान पुढे बोलताना तनपुरे यांनी सांगितले,
केंद्र शासनाच्या 2021/22 या वर्षाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा खरेदी करण्यासाठी राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे 19 फेब्रुवारी 2022 पासून केंद्र सुरु होत आहे.
त्यासाठीची नावनोंदणी सुरु करण्यात आली असून शासनाने धान्य खरेदीचे दर जाहीर केले आहेत. हरभरा पिकासाठी 5230 रुपये क्विंटल असे भाव असून ज्या शेतकर्यांना आपला शेतमाल द्यायचा असेल त्यांनी आपली नावे नोंदताना कागदपत्रे सोबत आणावीत.
नोंदणीसाठी शेतकर्याने स्वतः उपस्थित रहावे. नोंदणी झालेल्या शेतकर्यास नोंदणी क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.