पाथर्डीत हुंडाबळी ! विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव तप्पा येथे घडली. घडली. सासरच्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या करून आपले जीवन संपविले.

अनिता नागेश शिरसाठ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान मयत अनिता हिची आई नंदाबाई जयसिंग सानप (रा. घाट सावरगाव ता. पाटोदा जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

यावरून सासरच्या पाच जणांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा पती, सासू, सासरा, दीर व नणंद यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे नागेश मच्छिंद्र शिरसाठ (पती), मच्छिंद्र शिवाजी शिरसाठ (सासरा), शहाबाई मच्छिंद्र शिरसाठ (सासू),

महेश मच्छिंद्र शिरसाठ (दीर, सर्व रा. पिंपळगाव तप्पा ता. पाथर्डी) व सुनीता मारोती सानप (नणंद, रा. तागडगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe