अ‍ॅक्सिडेंटल विमा पॉलिसीचे नियम बदलणार; जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- सध्याच्या या रोगराई आणि महामारीच्या काळात हेल्थ किंवा लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र आता याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

ती म्हणजे पर्सनल अ‍ॅक्सिडेंटल पॉलिसीशी संबंधित नियम लवकरच बदण्याची शक्यता आहे. इन्शोरन्स रेग्युलेटर IRDAI याबाबत पावले उचलत आहे. विमाधारकांना येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन रेग्युलेटर इन्शोरन्स नियमांमध्ये बदल करण्याच्या योजनेमध्ये काम करत आहे.

नव्या अपडेट नियमानुसार जर कुठल्याही व्यक्तीने विना कुठल्याही ब्रेकशिवाय आपल्या पर्सनल अ‍ॅक्सिडेंटल पॉलिसीला रिन्यू करणे सुरू ठेवले आहे.

तसेच इन्शोरन्स कंपन्या त्या व्यक्तीच्या पॉलिसीला जीवनामध्ये कधीही रिन्यू करण्यास नकार देऊ शकणार नाहीत. त्याशिवाय कुठलीही इंश्योरन्स कंपनी पॉलिसीहोल्डरच्या वयाच्या आधारावर कधीही पर्सनल अ‍ॅक्सिडेंटल इन्शोरन्सला रिन्यू करण्यास नकार देता येणार नाही.

एक्सपोझर ड्राफमध्ये इन्शोरन्सशी संबंधित नियमांमध्ये बदलांमुळे संबंधित प्रस्तावामध्ये या प्रपोजलचाही समावेश आहे. जर कुणी पॉलिसीहोल्डर आपल्या इन्शोरन्स पॉलिसीला एका इन्शोरनस कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करू इच्छित असेल तर तो या संदर्भातील नियमांमध्येही बदलाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

पोर्टेबिलिटी फॉर्म रिसिव्ह केल्यानंतर पाच दिवसांच्या आत इन्शोरन्स कंपनीकडून आवश्यक माहिती घेतली पाहिजे. वैयक्तिक अपघात विम्यासाठी दीर्घकालीन नूतनीकरण प्रणाली आणणं, हा पॉलिसीधारकांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव आहे.

पोर्टेबिलिटीशी संबंधित प्रस्तावामुळे विमा कंपन्यांना जुन्या दाव्यांशी संबंधित माहिती मिळू शकणार आहे. पॉलिसीधारकाची तब्येत किंवा इतर परिस्थिती सुधारल्यास कंपन्यांना सवलत देण्यास प्रोत्साहित केलं जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe