अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- राहुरी खुर्द येथील हॉटेल न्यू भरत याठिकाणी पुणे धनकवडी येथील 31 वर्ष महिलेने घेतला फाशी घेतलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
धनकवडी( पुणे )येथील 31 वर्षीय अनिता राजू कणसे या महिलेने 22 फेब्रुवारी रोजी राहुरी खुर्द येथील हॉटेल न्यू भरत येथे रूम घेऊन राहात होती.
रात्री जेवण केल्यानंतर रुममधेच होती. आज सकाळी सफाई कर्मचाऱ्याने सफाई करण्यासाठी रूमचा दरवाजा वाजवला असता आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
म्हणून सफाई कर्मचाऱ्यांनी दरवाज्याच्या फटीतून पाहिले असता रूम मध्ये सदर महिला ही फॅनला लटकलेली दिसली सदर घटनेची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ राहुरी पोलिसांना कळवली
त्यानंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी घटनास्थळी धाव घेत सदर रूमचा दरवाजा तोडून फॅनला लटकलेल्या अवस्थेतील
त्या महिलेचा मृतदेह खाली उतरवला व शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असता त्या महिलेचे जवळील आधार कार्ड वरून तिचे नाव अनिता राजू कणसे राहणार धनकवडी पुणे असा पत्ता आढळून आला सदर महिलेने आत्महत्या का केली ? याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. पुढील तपास राहुरी पोलिस करत आहेत.