अर्बन बँकेतील ‘त्या’ घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर अर्बन बँकेतील 150 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये नगर अर्बन बँकेच्या 150 कोटी रुपयांचा घोटाळा संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बँकेचे सभासद तसेच माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी फिर्यादी दिली आहे. आरोपींमध्ये बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळासह इतर संस्थांचा समावेश आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या परवानगीने मंगळवारी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान नगर अर्बन बँकेमध्ये अनेक आर्थिक घोटाळे उघडकीला आलेले होते. या अगोदर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पुणे येथे आर्थिक घोटाळा संदर्भात एक गुन्हा दाखल झालेला आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेले आहेत.