जाती-धर्माचा भेद न बाळगणारे अवतार मेहेरबाबा यांचा 128 वा जन्मोस्तव

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- अवतार मेहेरबाबांचा 128 वा जन्मोस्तव 25 फेब्रुवारी रोजी जगात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यंदाचा जन्मोत्सव सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने साजरा होणार आहे.

अशी माहिती नगर सेन्टरचे अध्यक्ष डॉ.मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली अवतार मेहेर बाबा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८९४ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एका झोरास्ट्रियन कुटुंबात झाला.

मेहेर बाबा यांचे मूळ नाव मेरवान शेरियार इराणी असे होते. मेहरबाबा जगभर फिरले. पण त्यांनी अहमदनगरची भूमी निवडली. नगरजवळील वांबोरी रोडवरील पिपळगाव माळवी येथील आश्रमात राहत असत.

त्याची समाधी अरणगाव येथे मेहेरबाद येथे आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. कोण होते मेहेरबाबा ? जाणून घ्या मेहेरबाबांचा जन्म पुणे येथे 25फेब्रुवारी1894 रोजी झाला.

कॉलेजनंतर ते अध्यात्मिक क्षेत्राकडे वळले. शिर्डीचे साईबाबा,शिर्डी जवळील साकुरीचे उपासनी महाराज, पुण्याचे हजरत बाबाजान, नागपूरचे ताजुद्दीन बाबा, दौंड जवळील केडगांव बेटचे नारायण महाराज हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते.

सर्व जातीधर्मातील लोकांना मानवतेचा संदेश देत पुढे त्यांनी जगभर प्रवास केला. 25 फेब्रुवारी रोजी जन्मोत्सव होणार असून तो व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे १० जुलै १९२५ पासून ते आपल्या जीवनातील शेवटच्या श्वासपर्यंत मेहेर बाबांनी मौन धारण केले.

आपल्या अनुयायी आणि अन्य लोकांशी त्यांनी हातवारे करून तसेच मुळाक्षरांच्या फलकचा उपयोग करून संवाद साधला. जाती-धर्माचा भेद न बाळगता मेहेर बाबांनी गरीब, मानसिक आणि रोगी रुग्णांसाठी शाळा, दवाखाने आणि रुग्णालय हे विनामूल्य सुरु केले होते.

जुलै १९२५ मध्ये धारण केलेल्या मौन नुसार मेहेर बाबा हे आपल्या जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत शांत राहिले आणि ३१ जानेवारी १९६९ रोजी या महान गूढवादी आणि अध्यात्मिक गुरुचे निधन झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe