अहमदनगर ब्रेकींग: दोघा भावांवर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- किरकोळ कारणातून झालेल्या वादात दोघा भावांवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. राजीक युनूस शेख व शहबाज रजाक शेख (दोघे रा. लाइन बाजार, औरंगाबाद रोड, अहमदनगर) अशी जखमी भावांची नावे आहेत.

नगर शहरातील कोठला मस्जिद येथे ही घटना घडली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान राजीक शेख यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून चौघांविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतीन इलियास सय्यद, शहबाज राजाक शेख, उबेद इलियास सय्यद, परवेज इलियास सय्यद (चौघे रा. कोठला मस्जिद, तोफखाना, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

राजीक शेख व शहबाज शेख हे त्यांच्या बहिणीच्या घराकडून तोफखाना पोलीस ठाण्याकडे जात असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोठला मस्जिद समोर रोडने जात असताना मतीन सय्यद, शहबाज राजाक शेख, उबेद सय्यद व परवेज सय्यद हे चौघे तेथे आले.

त्यांनी राजीक व शहबाज यांना थांबविले. मतीन शिव्या देत राजीक यांच्या अंगावर धावून गेेला. त्याच वेळी उबेद याने त्याच्याकडील चाकूने राजीक याच्या डोक्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

राजीक सोबत असलेल्या त्याचा भाऊ शहबाज रजाक शेख याच्यावरही आरोपींनी चाकूने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

राजीक व त्याचा भाऊ शहबाज यांना आरोपींनी लाकडी दांडक्यानेही मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe