दोघा भावांवर खूनी हल्ला करणारा आरोपी गजाआड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  किरकोळ कारणातून दोघा भावांवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघां आरोपींपैकी एकाला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.

उबेद इलियास सय्यद (रा. कोठला मस्जिद, तोफखाना, नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

नगर शहरातील कोठला मस्जिद येथे बुधवारी दुपारी चौघांनी राजीक युनूस शेख व शहबाज रजाक शेख (दोघे रा. लाइन बाजार, औरंगाबाद रोड, अहमदनगर) यांना मारहाण करून चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी राजीक शेख यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून मतीन इलियास सय्यद, शहबाज राजाक शेख, उबेद इलियास सय्यद, परवेज इलियास सय्यद (चौघे रा. कोठला मस्जिद, तोफखाना, अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत. त्यांनी आरोपी उबेद सय्यद याला अटक केली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe