शेवगावातील ‘त्या’ भूखंड प्रकरणी तहसीलदारांना निनावी पत्राद्वारे दिला ‘हा’ इशारा

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  शेवगाव शहरातील बनावट एनए प्लॉट प्रकरणाची वाच्यता होताच येथील तालुका डेव्हलपर्सअसोसिएशनने तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दिला.याद्वारे त्यांनी आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे.

मात्र त्यावर कोणाचीही सही नसल्यामुळे नेमके हा अर्ज देणारे कोण आणि त्यातून त्यांना काय निष्पन्न करायचे आहे. याविषयी जोरदार चर्चा झडत आहेत.

या सर्व प्रकरणातील सुत्रधार कोण आहेत हे शोधावे असे भूखंडधारकांचे म्हणणे आहे. शेवगाव नगरपरिषदेच्या हद्दीत तहसीलदारांच्या बनावट सह्या व शिक्के वापरून अकृषक आदेश तयार करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरु आहेत.

अशा बनावट आदेशाव्दारे भुखंडांची खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली आहे.

या सर्व प्रकरणांची चौकशी केली असता ५५ गट नंबरमध्ये तहसीलदारांच्या बनावट सही व शिक्के वापरुन बोगस एन.ए.आँर्डर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानुसार विविध वृत्तपत्रातून सदर प्रकरणाला वाचा फुटल्यामुळे खरेदी विक्री करणारे व्यावसायिक खडबडुन जागे झाले. त्यांनी ज्यांना भुखंड विकले ते नागरीक जाब विचारत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe