अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- सध्या तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. याच तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास काय होऊ शकते याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या ठिकाणी गावातील मिलिटरी डेरी फॉर्मच्या ताब्यात असलेल्या ९०० एकरावर असलेल्या कुरण परिसरात अचानक आग लागली होती.
त्याची माहिती चिचोंडी पाटील गावामध्ये पोहोचताच येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक कोकाटे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेवर याची माहिती गावातील सर्व तरुणांना दिली व आग विझवण्यासाठी मदतीची विनंती केली.
नंतर गावातील शंभर ते सव्वाशे तरुणांनी कुरण या परिसरात येऊन जवळजवळ दोन तास प्रयत्नाची पराकाष्टा करून सर्व आग विझवली. त्यामुळे ९०० एकर पैकी आठशे एकरावरील नैसर्गिक साधन संपत्ती वाचली आहे.