सुनेला सासरी न पाठवल्याच्या रागातून सासऱ्याने चक्क व्याह्याचा घेतला चावा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- सुनेला सासरी नांदवायला पाठवत नसल्यामुळे सासर्‍याने तिच्या वडिलांच्या हाताला कडकडून चावा घेतला. यात मुलीचे वडील जखमी झालेत.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुजरूक गावात हि घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावई आणि त्याच्या वडिलांविरूद्ध हिवरखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या वसंता महादेव राऊत हे अकोला जिल्ह्यातील अडगाव बुजरूक येथील देवीपुरा भागात राहतात.

त्यांच्या मुलीचा चार वर्षांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील पाथर्डा येथील राहुल रमेश इंगळे सोबत विवाह झाला होता. मात्र, घरगुती वाद झाल्याने मुलगी आठ महिन्यांपासून माहेरी राहत होती.

एके दिवशी जावई राहुल आणि त्याचे वडील रमेश अडगाव येथे आलेत. “तुमच्या मुलीला आम्ही घ्यायला आलो आहोत. तिला नांदायला पाठवा, नाहीतर फारकत द्या”, असे म्हणून दोघांनी वसंता यांच्याशी वाद घातला.

यावेळी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण मारण्याची धमकी दिली. यातच मुलाचे वडील रमेश यांनी व्याही असलेले मुलीचे वडील वसंत राऊत यांच्या डाव्या हाताच्या पंजावर चावा घेतला.

मारहाण आणि चावा घेतल्याने वसंता जखमी झाले होते. या भांडणांनंतर वसंता राऊत यांनी अडगाव पोलीस चौकीत यासंदर्भात तक्रार केली होती. पोलिसांनी राहुल रमेश इंगळे आणि व्याही रमेश इंगळे यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News