सासरच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपवली

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात घडली आहे.

सौ.साक्षी अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,(वय १९, राहणार- भामाठाण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी,

सासरी नांदत असलेल्या सौ.साक्षी भोसले हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान याप्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात साक्षीचा नवरा अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,

सासरे रावसाहेब भोसले,सासू अनिता भोसले (सर्व रा. भामाठाण) यांच्याविरोधात हुंडाबळीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe