Best Car Under 6 lakhs :- मध्यमवर्गीयांची पहिली पसंती असलेल्या मारुती वॅगनआरने आता नवीन लूक, जबरदस्त मायलेज आणि अद्ययावत फीचर्ससह बाजारात प्रवेश केला आहे.
मारुती सुझुकीने देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारची फेसलिफ्ट आवृत्ती बाजारात आणली आहे. या कारचा यूएसपी उत्कृष्ट मायलेज आहे. आता नवीन फेसलिफ्ट मॉडेल मारुतीने उत्तम मायलेजसह सादर केले आहे. चला जाणून घेऊया या कारशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी:
25.19 किमीचा प्रवास एका लिटरमध्ये – मारुतीचा दावा आहे की, नवीन WagonR एका लिटरमध्ये 25.19 किमी पर्यंत मायलेज देईल. कंपनीने एक लिटर पेट्रोल इंजिनसाठी या मायलेजचा दावा केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, एक लिटर इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशन व्हर्जन असलेली WagonR एक लिटर पेट्रोलमध्ये 24.35 किमी धावेल. तसेच याशिवाय ही कार एक लिटर सीएनजीवर 34.05 किमीपर्यंत धावू शकते.
जाणून घ्या नवीन व्हर्जनच्या कारचा लूक कसा आहे – मारुतीने वॅगनआर फेसलिफ्टच्या लूकमध्ये बरेच बदल केले आहेत. कंपनीने हे नवीन व्हर्जन नवीन ड्युअल टोन कलर स्कीममध्ये बाजारात आणले आहे.
यात काळ्या छतासह गॅलंट रेड आणि मॅग्मा ग्रे असे दोन रंग पर्याय आहेत. कारच्या इंटीरियरलाही ड्युअल टोन टच देण्यात आला आहे. कंपनीने यामध्ये बेज आणि डार्क ग्रे रंगाचे पर्याय दिले आहेत.
या कारच्या इंजिनबद्दल जाणून घ्या – मारुती वॅगनआरच्या नवीन फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये, कंपनीने 1.2 लीटर इंजिनसह 1.0 लीटर के-सीरीज ड्युअल जेट आणि ड्युअल व्हीव्हीटी इंजिनचा पर्याय दिला आहे. कंपनीने ही कार फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह लॉन्च केली आहे. मारुती वॅगनआर सीएनजी 1.0-लिटर इंजिन पर्यायासह उपलब्ध असेल.
नवीन WagonR ची किंमत काय आहे? – नवीन मारुती वॅगनआर फेसलिफ्टची किंमत 5.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.10 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याच्या CNG मॉडेलची किंमत 6.81 लाख रुपये आहे. तसेच कंपनी ही कार सबस्क्रिप्शन मॉडेलसह देत आहे.