अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाला दगड, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगर शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात इंगळेवस्तीवर घडली.
या मारहाणीत विशाल दादा जगधने (वय 26 रा. इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशन) हा तरूण जखमी झाला आहे. जखमी विशाल जगधने याने रूग्णालयात कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून वसीम शेख, बाबा पठाण, वसीम शेख याची पत्नी व बहिणीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंगळे वस्ती येथे विशाल हा त्याच्या दुचाकीवर बसून त्याचा मित्राची वाट पाहत होता. त्यावेळी वसीम व बाबा हे दुचाकीवरून आले. त्यांनी दुचाकीचे चाक विशालच्या डाव्या पायावर घातले.
यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद पाहून वसीमची पत्नी, बहिण व इतर अनोळखी महिला तेथे आल्या. त्यांनी विशालला शिवीगाळ करत आरडाओरडा केला.
त्याचवेळी बाबा पठाण याने दगड उचलून विशालच्या पायावर मारला. वसीम याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. विशालच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.