जमिनीच्या वादाने जीव घेतला…महिलेचा खुन करून मृतदेह जमिनीत गाढुन ठेवला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- एका 42 वर्षीय एका महिलेचा जमिनीच्या वादातुन खुन करून मृतदेह जमिनीत गाढुन पुरावा नष्ट केल्याची घटना वटणवाडी येथे घडली आहे. मंदा गायकवाड असे खुन करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर घटना उघडकीस येताच तिघाजणांना आष्टी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील मंदा हिराभाऊ गायकवाड वय 45 वर्ष हिला भावकीतीलच भरत गायकवाड व जावई प्रल्हाद घुमरे, आणि त्याचा मित्र सुनिल गांगड हे सतत महिलेला फोन करून व प्रत्यक्ष भेटुन जमिन आमच्या नावावर कर असा तगादा लावत जिवे मारण्याची धमकी द्यायचे.

यातुनच 3 नोव्हेंबर 2021 रोजी सदरील महिलेला रात्री शेतात तुरीला पाणी देण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिचा खुन करून मृतदेह जमिनीत पुरून टाकल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत मयत महिलेचा भाऊ केरू किसन चितळे याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध खुन व मृतदेह नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe