अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- अहमदनगर शहरातील रेल्वे स्थानकात पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांचे वय अंदाजे 40 वर्ष असावे. ही घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता लक्षात आली.
दरम्यान या व्यक्तीचे यकृत खराब झाल्याने मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. मयत व्यक्तीचा अंगाने मध्यम, रंगाने गहूवर्ण असून उंची 173 सेमी आहे.
डोक्याचे केस वाढलेले, नाक सरळ, डोळे घारे, अंगात राखाडी हिरवट टि शर्ट, लालसर काळी फुलपँट, लाल रंगाचा करदोरा आहे.
या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास रेल्वे पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अधिकारी तथा पोलीस हवालदार सी. एल. देशमुख यांनी केले आहे.