अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :-भरधाव वेगाने जाणारे वाहन आणि दुचाकीची धडक होऊन महिलेचा मृत्यू झाला. आशा आनंद गाढवे (वय 45 मूळ रा. खातगाव टाकळी ता. नगर, हल्ली रा. डावरेगल्ली, अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
अहमदनगर – पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. आशा गाढवे या दुचाकीवरून अहमदनगर– पुणे महामार्गाने जात होत्या. कामरगावातील वळणावर त्यांना वाहनाने जोराची धडक दिली.

या अपघातात त्या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ग्रामस्थांनी रूग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात पाठविले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.