चक दे इंडिया ! भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Cricket News :- आयसीसी विश्वचषक(ICC World Cup) स्पर्धेत मिताली राज(Mitali Raj) हिच्या टीम इंडियाने(Team India) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान(Pakistan team) संघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले आणि बे ओव्हल येथे सलामीच्या सामन्यात 107 धावांनी जोरदार विजय मिळवून विश्वचषकची जोरदार सुरुवात केली.

भारताच्या विजयात स्नेह राणा, स्मृती मंधाना, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्रकर यांनी निर्णायक भूमिका बजावली. स्मृती, स्नेह आणि पूजा यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 245 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

भारताने दिलेल्या 245  धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात संथ झाली. त्यांनी 10 षटकात फक्त 26 धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजी आक्रमणापुढे गुडघे टेकले आणि 43 षटकांत फक्त 137 धावाच करू शकले.

दरम्यान भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर झुलन गोस्वामी आणि स्नेह राणा यांनी दोन व दीप्ती शर्मा-मेघना सिंग हिला एक विकेट मिळाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News