Renault च्या कारवर तब्बल 80000 हजारांची डिस्काउंट ऑफर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Automobile News :- तुम्ही कार खरेदीचा विचार करत असाल, आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रेनॉ क्वीड कार तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली कार ठरू शकते.

Renault India ने या बजेट कारवर आणखी तब्बल 80000 हजारांची डिस्काउंट ऑफर दिली आहे. ग्राहक 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

असा असणारे आहे बंपर डिस्काउंट
Renault Kwid वर 80000 रुपयांच्या ऑफरमध्ये 10000 रुपयांपर्यंत रोख सूट, 15000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 10000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट सामिल आहे. त्याशिवाय रेनॉ आपल्या जुन्या ग्राहकांना 37000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनसही देत आहे. जुनं वाहन स्क्रॅप केल्यानंतर 10000 रुपयांची वेगळी ऑफरही ग्राहकांना दिली जात आहे.

जाणून घ्या कारचे आकर्षक फीचर्स –

Renault Kwid 2 पेट्रोल इंजिन पर्यायात उपलब्ध आहे. पहिलं 0.8-लीटर इंजिन असून हे 54 bhp पॉवर आणि 72 nm टॉर्क जनरेट करतं. दूसरं 1.0-लीटर पेट्रोल इंजिन असून यात 68 bhp पॉवर आणि 91 nm पीक टॉर्क जनरेट करतं. एक लीटर पेट्रोलमध्ये कार 22 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते.

कारमध्ये 8 इंची टचस्क्रिन इंफोटेनमेंटसह अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो, कीलेस एन्ट्री आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा दिला आहे. तसंच मॅन्युअल एसीदेखील आहे.

स्टायलिश लूक
कंपनीने स्टायलिश हेडलँप्ससह कारमध्ये LED डीआरएल, LED टेललँप्स, मल्टी स्पोक्ड व्हील्स दिले आहेत. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने यात एबीएससह ईबीडी, रियर पार्किंग सेंसर्स आणि इतर सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

जाणून घ्या काय आहे किंमत
कार 4.24 लाख रुपये एक्स शोरुम किमतीत ग्राहकांना मिळते. आता यावर 80000 रुपये डिस्काउंट दिला जात असून कारची किंमती आणखी कमी होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News