केसगळतीने परेशान आहात? या टिप्स केस गळती रोखण्यासाठी करतील मदत

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Health news :- डोक्यावर घनदाट केस असले ककी एक वेगळाच रुबाब पाहायला मिळतो. व केस गळतीमुळे तसेच टक्कल पडल्याने अनेक जण आत्मविश्वास हरवून बसतात. दरम्यान केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ही अतिशय सामान्य समस्या आहे.

परंतु काही पुरुषांमध्ये अचानक केस गळण्याची समस्या सुरु होते. केसगळतीमुळे पुरुषांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला टक्कल पडू लागते. कसे गळतीच्या काही प्रमुख कारणांमध्ये प्रामुख्याने जास्त ताण, वैद्यकीय स्थिती, औषधांचे सेवन किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे पुरुषांचे केस गळू लागतात.

आपणही या त्रासाला सामोरे जात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहे जे तुम्हाला या समस्येपासून वाचवेल.

केसगळती रोखण्यासाठी महत्वाच्या टिप्स
सर्व प्रथम, पुरुषांनी त्यांच्या केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे. केस विंचरताना ते जास्त ओढू नयेत.
जेव्हा तुम्ही केस विंचराल तेव्हा रुंद दात असलेला कंगवा वापरा, जेणे करून तुमचे केस ओढले जाणार नाहीत.
केसांना गरम रोलर्स, कर्लिंग आयर्न, गरम तेल लावणे टाळा. यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. या कारणामुळेही तुमचे केस गळायला लागतात.
रबर बँड, बॅरेट्स किंवा वेणी बांधल्याने केसांवर ताण येतो. त्यामुळे ते देखील टाळा.
तुम्हालाही येत असेल प्रमाणाच्या बाहेर राग, तर ‘या’ टिप्सचा वापर करून मिळवा रागावर नियंत्रण

या गोष्टी लक्षात ठेवा
तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी योगाभ्यास करा आणि आनंदी रहा.
कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
सूर्यप्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या इतर स्रोतांपासून आपल्या केसांचे संरक्षण करा.
धूम्रपान- तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन बंद करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe