तरुणीने केली लग्नाची मागणी अन घडले भलतेच..? वाचा सविस्तर….!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह सोहळा म्हणजे एक पवित्र बंधन, दोन जीवांचे मिलन, विवाहाच्या निमित्ताने दोन कुटुंबाचे एकमेकांशी नातेसंबंध जुळले जातात.

त्यामुळे विवाह म्हणजे जीवनातील अविस्मरणीय असा प्रसंग आहे. मात्र लग्नाची मागणी केल्याने प्रियकराने मित्रांच्या मदतीने मुलीला चक्क मारहाण केल्याची घटना नगर शहराजवळ असलेल्या भिंगार येथे घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, येथील एका तरुणीचे मागीलसहा वर्षांपासून एका तरुणासमवेत प्रेमसंबंध होते. दरम्यान तिने या तरुणाकडे आता आपण दोघे लग्न करू अशी मागणी केली.

परंतु तिने केलेल्या या मागणीचा राग आल्याने या तरुणाने पाच-सहा मित्रांच्या मदतीने त्या तरुणीला चक्क लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातया तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe